#BrianTracy#AGreatWriter - या लेखका बद्दल व याच्या पुस्तकांविषयी
#A Great Writer
Get it done now, How The best leaders lead या दोन पुस्तकांनंतर आज Brian Tracy चे उद्योजक व्हा हे पुस्तक वाचून पूर्ण झाले.
याआधीच्या दोन पुस्तकांवर मी लिहताना मी फक्त त्यातली टिपणे (Notes) मी दिल्या होत्या . पण आता मी Briyan Tracy ची लेखन शैली आहे , त्याबद्दल वाचकांशी हितगुज करणार आहे .
सेल्फ हेल्प किंवा मोटिवेशनल प्रकारातील मी शेकडो पुस्तके वाचली आहेत . त्या यादीत Magic of Thinking Bog , Think and Grow Rich, 7 Habits of Highly effective people ते इतर बरीच पुस्तकें अशी खूप मोठी यादी आहे . पण यातली काही महत्वाची पुस्तके अशी आहेत की तुमच्यात ती maturity येत नाही , तोपर्यंत ही पुस्तकं आपल्याला कळत नाहीत . ही वर उल्लेख केलेली पुस्तकं थोडं थांबत थांबत , समजून घेत वाचावी लागतात . पण ट्रेसी हा अफलातून लेखक आहे . तो खूप सोपी भाषा वापरतो . तुम्हाला काय हवे आहे , हे त्याला पक्के कळते. एखाद्या लहान मुलाला जसे आपण बोट धरून चालायला शिकवतो , तसेच अगदी Tracy आपल्याला पुस्तकाच्या प्रत्येक पाना-पानातून आपला हात धरून आपल्याला चालवत राहतो .
दहा वर्षांपूर्वी कधीतरी मी Brian Tracy चे #GOALS वाचले होते . पण त्यानंतर हा लेखक माझ्या हातातून कसा कोण जाणे निसटून गेला होता .. गेल्या सहा महिन्यात परत सापडला ,तर मी खूप प्रभावित झालो आहे .
Tracy खूप प्रॅक्टिकल आहे . तो सांगताना कुठल्याही हायफाय गोष्टी आपणास सांगत नाही . नुसत्याच हवेत गप्पा न मारता ' नेमके काय केले पाहिजे ?' हे अचूक सांगतो . उदाहरण देतो , ज्याला सेल्स या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्याने चांगले कपडे घातलेच पाहिजे हे ट्रेसी ठामपणे सांगतो . शिवाय तुम्हाला कुठले कपडे घालायला आवडतात यापेक्षा तुमच्या ग्राहकाला तुम्ही कोणते कपडे घालावेत असे वाटते ते जास्त महत्वाचे आहे , असे ट्रेसी उदाहरणे देऊन सांगतो .
ब्रायन ट्रेसी स्वतः या सगळ्या अनुभवातून गेला आहे . घोर अपयश , मग प्रचंड प्रयत्न , परत परत येणारे अपयश , मग न थांबता प्रयत्न केल्यामुळे मिळालेले यश हा ट्रेसी चां प्रवास आहे . शिवाय त्याचे स्वतःचे वाचन ही प्रचंड आहे , असे दिसते. हे वाचन त्याच्या लिखाणातून आपल्याला जाणवत राहते .
मी नुकत्याच वाचून काढलेल्या " उद्योजक " पुस्तकात ट्रेसी सांगतो की , तो स्वतः खूप नोटस काढतो . त्याने नोटस काढलेल्या वह्यांची कपाटे भरली आहेत . बहुधा त्यामुळेच लिहताना त्याला शब्दांची कमतरता भासत नाही , एखादी गोष्ट समजून सांगताना द्यायची उदाहरणे कमी पडत नाहीत . आजच्या सगळंच ऑनलाईन असण्याच्या वां ऑनलाईन करायचे युगात ट्रेसी पेपर हातात घेऊन त्यावर लिहून काढणे किती महत्वाचे आहे हे आपणास सांगतो . ब्रायन ट्रेसी हा आज जगभरात खूप लोकप्रिय लेखक , व्याख्याता असूनही त्याच्या पुस्तकांत#Basics कुठेही सुटलेले दिसत नाहीत . सोप्पेपणा ही त्याची ताकद आहे , ती ही कायम दिसते . यामागे त्याचे स्वतःचे अनुभव , प्रचंड वाचन हेच कारणीभूत आहेत . असे म्हणतात की , " *अवघड लिहणे खूप सोपे असते , पण सोपे व वाचकांना समजेल असे लिहणे खूप अवघड असते "* . या कसोटीवर ट्रेसी चे नाणे खणखणीत आवाज करते .
स्वतःला बदलणे ही खूप दीर्घ प्रक्रिया आहे . बऱ्याच (९९% लोकांना, मी ही त्यात आहेच) जणांना स्वतःला बदलणे नको वाटते . अशा वेळी केवळ सेल्फ हेल्प किंवा motivational प्रकारातील पुस्तकें वाचून, "आपण खरंच स्वतःला बदलू शकतो का ? " हे सांगणे खरंच कठीण आहे . मानवी स्वभाव , त्याला मिळणारी परिस्थिती , त्याला येणाऱ्या अडचणी , त्याची स्वप्ने , त्याची दुःख हे वैश्विक आहेत , सारखीच आहेत . त्यामुळेच अमेरिकेत राहणारा ब्रायन ट्रेसी जी उदाहरणे आपल्याला (भारतात राहणाऱ्या वाचकाला ) देतो , ती अमेरिकेत राहणाऱ्या वाचकाप्रमाणे आपल्याला ही लागू होतात . म्हणूनच हे सर्व ट्रेसी चे लेखन वाचताना आपण त्यात गुंतत जातो , नकळत आपल्यात काय बदल करायला हवाय , याचा निदान विचार करायला सुरुवात करतो ..
अजून एक, ब्रायन ट्रेसी कुठेलेही पुस्तक लिहताना, इतरांच्या ही पुस्तकांची नावे देतो , त्यातून त्याला स्वतःला काय शिकायला मिळाले हे सोदाहरण सांगतो , ते मला फार भावले . ब्रायन ट्रेसी ने त्याच्या आयुष्यात अक्षरशः हजारो लोकांना मार्गदर्शन केले आहे , अशा या लोकांच्या अपयशाची , यशाची उदाहरणे आपल्या समोर ट्रेसी फुकट वाटत राहतो .
मी सध्या वाचून पूर्ण केलेल्या "उद्योजक व्हा! " हे पुस्तक ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा व वाढवायचा आहे त्यांच्यासाठी खूप भारी पुस्तक आहे .
या पुस्तकातील काही मला आवडलेली वाक्ये अशी
" यशस्वी होण्याचे प्रदीर्घ उद्दिष्ट मनात असेल तर इतरांचे सल्ले विचारत राहणे नक्कीच महत्वाचे ठरते "
" तुमच्या ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे , हे तुम्ही कसं शोधून काढाल? त्यांना थेट विचारा, आणि तेच तुम्हाला सांगतील ."
" मी (म्हणजे ट्रेसी ) वयाच्या विशीत होतो , मी एक महान नियम शिकलो , तो म्हणजे ' *कागदावर विचार करा '*"
" प्रत्येक माणूस स्वतःच्या मिळकती साठी जबाबदार असतो . त्यामुळे तुम्ही आज जे काही कमवत आहात तेवढी कमाई आपण मिळवायची हे आपण ठरवलेले असते "
" लोकांना जी गोष्ट हवी आहे , गरजेची आहे ,ज्यासाठी पैसे मोजायला ते तयार आहेत आणि जी गोष्ट आपण त्यांना विकू शकू - अशा गोष्टींचा शोध घेणे यात उद्योजकतेचे सार आहे "
" एका वेळेला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता हे यशासाठी प्रचंड आवश्यक असणारं कौशल्य आहे . "
" चांगला विक्रेता शोधणे आणि कामावर ठेवणे हे जगातल्या सर्वात कठीण
कामापौकी एक आहे "
अशी अजून बरीच वाक्ये आहेत ..जी आपल्या आत घुसत राहतात , आपल्याला शिकवत राहतात ..
तळटीप -
तुम्ही देखील जर ब्रायन ट्रेसी ला वाचलं असेल तर तुमचेही काय मत आहे ,हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद
@ हेमंत सांबरे
Comments
Post a Comment