कोई जब तुम्हारा हृदय तोड दे.... हेमंत सांबरे
कोई जब तुम्हारा हृदय तोड दे ......
- हेमंत सांबरे
प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या आकंठ प्रेमात बुडालेला आहे ...पण तिला त्याची जाणीव नाही , तिला त्याची अजिबात ही किंमत नाही ...ती त्याच्या पासून दूर दूर जात आहे , त्याला ते दिसत आहे की ,त्याचे निर्व्याज प्रेम तिला कळत नाही ..त्याचे प्रेम मात्र स्वार्थाच्या , स्वमग्नतेच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे ..ती दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडत आहे , किंवा पडलीच आहे हे त्याला दिसत आहे ..ती आता परत येणार की नाही हे ही त्याला माहीत नाही ...तिच्या परत येण्याचे सगळेच रस्ते तिने बंद केले असेल तरी तो मात्र स्वतःचा दरवाजा केवळ तिच्यासाठी उघडुन बसला आहे ... ती जरी दुसऱ्या कुणाकडे गेली असली तरी याचे हृदय मात्र फक्त आणि फक्त तिच्यासाठी रिकामे आहे ...
तो हे पक्के जाणतो की तिला आता आपली काहीही गरज नाही कारण ती खूप सुंदर आहे , तिच्यावर खूप जीव टाकणारे तिला मिळत आहेत ...पण तो तिला निक्षून सांगतो की हे सारे फक्त तिचे सौंदर्य , तिचे तारुण्य यालाच भुलून तिच्या जवळ आले आहेत ... पण , पण एक दिवस असा येईल की तिचे हे सौंदर्य , हे तारुण्य तिला सोडून जाईल ...मग तिला जवळ करणारे ही तिला सोडून जातील ....तेव्हा मग तुला कदाचित जर माझ्याकडे यावेसे वाटले तरी मी तोपर्यंत तसाच असेल , नम्र तुझी वाट पाहत असलेला , मेरा सर जैसा पहले झुका हुआ था , वो सर वैसे ही झुका ही रहेगा, सिर्फ तुम्हारे लिये ... वा इंदीवर आपण इथे शब्दांची खरंच कमाल केली आहे ...
शेवटच्या कडव्यात मनोज कुमारने आपल्या भारतीय संस्कृती मध्ये प्रेम कसे केले जाते ते इंदिवर कडून लिहून घेतलेले दिसते आहे . खरे प्रेम हे कुठलीही अट न ठेवता केले जाते , पण तुमच्या या पाश्चात्य संस्कृती मध्ये तुम्ही अटी (clauses) ठेवूनच प्रेम ही करतात .. इकडे (कथा लंडन मध्ये घडत आहे ) राहून तुम्ही आपली संस्कृती विसरला आहात ..
तुझ्याभोवती हा खोटेपणाचा अंधार पसरला आहे , ज्याने तुला पूर्ण घेरून टाकले आहे .. जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळीकडे फक्त अंधार व निराशाच पसरली असेल तेव्हा ही मी दीपक (दिवा) बनून मी फक्त तुझ्यासाठी जळत राहील , तेव्हा तुला जर माझ्याकडे यावेसे वाटले तर मी तुझी वाट पाहत राहील ...
कसले प्रेम आहे हे ! म्हणजे जेव्हा तुला एखाद्या गोष्टीत सुख मिळतंय ना , मग तू खुशाल त्या सुखाच्या मागे जा , माझी काही हरकत नाही .. पण हे प्रिये ! , जेव्हा केव्हा तुझ्या आयुष्यात काही दुःख येईल , तुला कुणी धोका देईल तेव्हा अगदी तुझे तारुण्य , तुझे सौंदर्य ही संपले असेल तेव्हा ही मी तुझ्यासाठी वाट पाहत तसाच उभा असेल , केवळ तुझ्यासाठी ! किती उदात्त कल्पना आहे ..
मुकेश हा काही माझा फार आवडता गायक नाही . पण या कोई जब तुम्हारा गाण्यात तो गातो तेव्हा आपल्या हृदयाची प्रत्येक तार न तार तो छेडतो... इंदीवर ने कमाल केली आहे .. कल्याणजी आनंदजी यांनी तर या गाण्यात मागचे संगीत अतिशय कमी व low ठेवून मुकेशच्या दर्दभऱ्या आवाजालाच संगीत बनवले आहे ..
विशेषतः हे गाणे तुम्ही हेडफोन लावून , डोळे झाकून ऐका ... गीतकार , संगीतकार, गायक या प्रत्येकाने घेतलेली मेहनत तुम्हाला जाणवेल ..
ज्यांनी आयुष्यात एकतर्फी प्रेम केले असेल , ज्या कुणाला अगदी व्यक्त करणे ही जमले नसेल किंवा व्यक्त करूनही ते प्रेम त्यांच्या पासून दूर गेले असेल किंवा त्यांच्या दुर्दैवाने ते प्रेम मिळालेच नसेल त्यांना तर हे गाणे खूपच भावनिक वाटेल , आपलेसे वाटेल ..
आता हे कविता रुपी गाणे वाचा , मग हेडफोन लावून , डोळे मिटून निवांत ऐका व हा अद्भुत आनंद नक्की घ्या 👇👇👇
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा दर खुला है, खुला ही रहेगा
तुम्हारे लिए...
अभी तुम को मेरी ज़रूरत नहीं
बहुत चाहने वाले मिल जायेंगे
अभी रूप का एक सागर हो तुम
कँवल जितने चाहोगी खिल जायेंगे
दर्पण तुम्हें जब डराने लगे
जवानी भी दामन छुड़ाने लगे
तब तुम मेरे पास आना प्रिये...
कोई शर्त होती नहीं प्यार में
मगर प्यार शर्तों पे तुमने किया
नज़र में सितारे जो चमके ज़रा
बुझाने लगीं आरती का दीया
जब अपनी नज़र में ही गिरने लगो
अंधेरों में अपने ही घिरने लगो
तब तुम मेरे पास आना प्रिये...
चित्रपट - पुरब औंर पश्चिम
गीतकार - इंदीवर
संगीत - कल्याणजी आनंदजी .
© हेमंत सदाशिव सांबरे
०७.११.२०२३
Comments
Post a Comment