पुस्तक परिक्षण ा#11 रुल्स फॉर लाईफ#chetanbhagat

#पुस्तक परीक्षण
#11 रुल्स फॉर लाईफ
#chetanbhagat

अलीकडेच  पुण्यात झालेल्या पुस्तक महोत्सवामध्ये हे पुस्तक मी विकत घेतले. चेतन भगत हा माझा अतिशय आवडता लेखक आहे त्यांची बहुतांश पुस्तके मी वाचून पूर्ण केलेले आहेत.
चेतन भगत यांनी लिहिलेले इंग्लिश खूप सोपे असल्यामुळे सहसा मी त्यांची इंग्लिश पुस्तके वाचतो, परंतु या महोत्सवात मला इंग्लिश पुस्तक न मिळाल्याने,  मी मराठी पुस्तक विकत घेतले व ते वाचून पूर्ण केले.

या पुस्तकातून चेतन भगत यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित 11 नियम तयार केले आहेत आणि ते आपल्या वाचकांबरोबर त्यांनी शेअर केले आहेत. कथेच्या माध्यमातून आपल्या पुस्तकाची मांडणी करणे ही भगत यांची पद्धत आहे. त्याच पद्धतीने त्यांनी हेही पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे वाचताना अतिशय मनोरंजनात्मक वाटते आणि पुस्तक पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही .
आरोग्य सारख्या महत्त्वाच्या विषयावर सुरुवात करून त्यांनी अगदी गुंतवणूक हा अलीकडच्या काळात दुर्लक्षित राहणारा घटक तोही त्यांनी या नियमांमध्ये मांडला आहे.  त्यांची मांडण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे पुस्तक बिलकुल ही क्लिष्ट वाटत नाही.

मी सोबत पुस्तकाच्या मुखपृष्टाबरोबर त्याचे अनुक्रमणिका ही जोडली आहे त्यामुळे वाचकांना या पुस्तकात नेमके काय आहे ते सहजगत्या समजेल.
आजच्या काळात इंग्लिश भाषा बोलणे व लिहिणे का महत्त्वाचे आहे हे देखील त्यांनी एका प्रकरणांमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवले आहे.
मोठे ध्येय साध्य करताना त्यांनी हत्तीचे उदाहरण दिले आहे. म्हणजेच मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे जर तुकडे केले तर ते ध्येय साध्य करणे सोपे जाते,  हे त्यांनी हत्ती तुकड्यांमध्ये खावा लागतो असे उदाहरण देऊन सांगितले आहे.
एका प्रकरणात त्यांनी दिलेले झुरळाचे उदाहरण मला व्यक्तिशः खूप आवडले. कारण झुरळ हा या पृथ्वीतलावरचा सगळ्यात लवचिक प्राणी आहे व तो कुठल्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतो म्हणूनच गेली लाखो वर्ष तो या पृथ्वीवर टिकला आहे. त्याच प्रकारे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर झुरळासारखे सगळ्या परिस्थितीशी जुळून घेण्याचे आपल्याला शिकावे लागेल.
बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनातील अपयशाबद्दल इतरांना दोष देत राहतो. भगत यांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःकडे दोष घेऊन,  आत्मपरीक्षण कसे करावे याबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने 'दोष स्वतःकडेच'  या प्रकरणात सांगितले आहे.
शेवटी गुंतवणूक या प्रकारावरती त्यांनी अतिशय उपयुक्त अशा टिप्स देऊन, वाचकांना काही बेसिक गोष्टी सांगितल्या आहेत. हे शेवटचे प्रकरण ही खूप वाचनीय झाले आहे.
मोटिवेशनल प्रकारातील पुस्तके खरंतर सतत वाचत राहावे लागतात, त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये थोडा थोडा बदल होत राहतो. त्यामुळे मला असं वाटते की महिन्यातून एक तरी पुस्तक अशा प्रकारचे वाचले पाहिजे.

हे पुस्तक पूर्णपणे काल्पनिक असूनही रोजच्या जीवनाशी त्याला जोडल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे वाचकांना विनंती आहे की मराठी किंवा इंग्लिश जे काही तुम्हाला जमते किंवा आवडते त्या प्रकारात हे पुस्तक घेऊन नक्की वाचा.
माझ्या वर्षाचा शेवट अशा प्रकारचे उत्कृष्ट पुस्तक वाचून होत आहे, याचा  मला अतिशय आनंद होत आहे.
© हेमंत सांबरे
३०.१२.२०२४. 

Comments

  1. आनंद मिळवत रहा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर