जगत जननी
हा एक साधाभोळा भक्त आहे , तो खरे तर काही मागण्याच्या इच्छेने देवीकडे निघाला आहे ,पण जेव्हा देवीचे खरोखर दर्शन झाले तेव्हा हा भक्त नुसत्या देवीच्या दर्शनाने तृप्त झाला आहे व काही मागण्याची त्याची इच्छाच राहिली नाही कारण त्याला जाणीव होते की देवीने आपल्यास सर्व काही दिले आहे 👇👇👇 *जगतजननी जगन्माता आई माझी अंबामाता आई तुझ्या रूपे लाभली कल्पवृक्षाची गे साऊली तव दर्शनाची आता लागे आस या भक्ता माऊली माय भवानी , माय अंबिका पुण्यधाम , लाभे तुझ्या चरणी तुझ्या दर्शनाने गे जगदंबे आयुष्य लागले सत कारणी मिळाले तुझे दर्शन माते, भरून पावलो सारे काही तृप्त झाले मन ,वाटे निवांत नाही मागणे उरले काही © हेमंत सांबरे २०.१२.२०२० .*