Posts

Showing posts from June, 2023

Get It Done Now - Brian Tracy - पुस्तकाची टिपणे

Image
Get it done Now  - Brian Tracy  Notes  -   हेमंत सांबरे  काम करणं ही आयुष्य भरासाठी शिक्षा आहे असा विचार करणारे लोक आर्थिक दृष्ट्या खालच्या पातळीवर असतात  यशस्वी लोकांचा एक सगळ्यात महत्वाचा गुण असतो म्हणजे त्यांचा निर्धार पक्का असतो . कितीही नैराश्य आले तरीही ते त्यातून बाहेर पडतात आणि आपले काम करत राहतात .  यशस्वी लोक पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान उठतात . स्वप्रयत्नाने श्रीमंत झालेले लोक सहाच्या आधीच उठतात . पुस्तक विकत घेणारे आणि वाचणारे लोक कोण असतात असं तुम्हाला वाटते ? ते गरीब नक्कीच नसतात .  तुम्ही एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलात तर तिथे तुम्हाला सर्वत्र पुस्तकच पुस्तकं दिसतील आणि गरीब लोकांच्या घरी गेलात तर तिथे तुम्हाला मोठा टिव्ही दिसेल पण पुस्तकं अजिबात दिसणार नाहीत . कारण ते वाचन करत नाही . स्वयंशिस्त हीच श्रीमंती ची गुरुकिल्ली आहे . एखादं काम करायचं ठरवलं असेल तर ते काम सुरू ठेवण्यासाठी शिस्त गरजेची असते . जेव्हा ठरवलेलं काम आपण पूर्ण करतो तेव्हा आपल्याला स्वतः बद्दल अद्भुत अशी भावना उत्पन्न होते . कामाच्या ठिकाणी फक्त काम आणि ...

#सावरकर समजून घेताना - पुस्तकाचे रेवणसिद्ध लोणकर यांनी केलेले परीक्षण

Image
#पुस्तक नाव - सावरकर समजून घेताना.. #लेखक - हेमंत सांबरे  परीक्षण लेखन -  रेवणसिद्ध लोणकर, वारजे , पुणे  स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतीसूर्य....सावरकरांविषयी काही लिहायचे म्हणजे मेरू पर्वत उचलण्यासारखे आहे ,कारण स्वतः सावरकरांनी जवळपास ८००० पेक्षा जास्त  पाने लिखाण केले आहे त्यानंतर धनंजय कीर, विक्रम संपत , बाळाराव सावरकर , वि.स. वाळिंबे यांचे सुद्धा सावरकरांवर भरपूर लिखाण आहे. मग " सावरकर समजून घेताना "या पुस्तकात नवीन असे वेगळेपण काय आहे हा प्रश्न पडला होता. पुस्तक वाचताना एक गोष्ट जाणवली, पुस्तकात  लेखकाने सावरकरांचे विचार एकदम साध्या व सोप्या भाषेत मांडले आहेत. जेणेकरून एका सामान्य माणसालाही मोजक्या शब्दात त्याचा सार कळेल. पुस्तकाची मर्यादित पृष्ठसंख्या असल्याने कोणताही नवीन वाचक  सुद्धा पुस्तक वाचण्यास सहज प्रवृत्त होऊ शकतो.    सदर पुस्तकात लेखकाने फारशा  परिचित नसलेल्या गोष्टी न विषयी प्रथम प्रकाश पाडला आहे. जसे नाशिक येथील दुर्लक्षित अभिनव भारत मंदिर , सावरकर - खारचा बंगला आणि cyclostyle machine , सावरकर आणि कविता. १९...

"त्या तिघी " डॉ सौ शुभा साठे लिखित पुस्तकाचे परीक्षण - हेमंत सांबरे

Image
#पुस्तकाचे नाव - त्या तिघी #लेखिका - डॉ सौ शुभा साठे #लाखे प्रकाशन , नागपूर  आजच सकाळी  डॉ शुभा साठे लिखित " त्या तिघी" ही कादंबरी वाचून पूर्ण केली . वाचून पूर्ण होताच त्यावरची माझी प्रतिक्रिया / परीक्षण लिहायला बसलोय .  एखाद्या नाटकातील कसलेला नट जी भूमिका त्याच्या वाट्याला आली आहे , तो ती भूमिका इतकी समरसून करतो की , पाहणाऱ्या प्रेक्षकांना वाटते की तो नट स्वतः ती व्यक्ती नसून तो म्हणजे ती भूमिकाच आहे असे वाटते . याला बऱ्याचदा ' परकायाप्रवेश ' असेही म्हटले जाते , इतके ते एकरूप भासते . या कादंबरीच्या बाबतीत ही असेच म्हणावे लागते . त्या तिघी ही कादंबरी सावरकर घराण्यातील  तीन  बंधूंच्या तीन पत्नी यांच्यावर लिहली आहे . सावरकर बंधू भारताच्या स्वातंत्र्यासाठी पेटलेल्या होमकुंडात स्वतःचे योगदान देत असताना , त्यांच्या मागे , ते नसताना घरी जो त्यागाचा  होम पेटला होता , तेव्हा  नेमके काय घडतं होते , त्याचे यथार्थ पण भावस्पर्शी वर्णन एकूण २५ प्रकरणांच्या या पुस्तकात दिले आहे .  हे वाचताना आपणास असे वाटते की हे सगळे घडतं असताना स्वतः लेखिका ही त्...