Posts

Showing posts from July, 2023

दारू न पिणाऱ्या 'मनोज 'ची अफलातून स्टोरी

Image
"दारू न पिणाऱ्या मनोजची अफलातून स्टोरी "  लेखक - हेमंत सांबरे  आज तर दारू , बियर , वाईन इ इ पिणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा , मानसन्मान असण्याच्या काळात , " दारू न पिणाऱ्या मनोज " ची स्टोरी कुणी तरी वाचेल का ? अशी शंका येणे सहज आहे . माझ्याही मनात तीच शंका आली . म्हणून मी आपला  ' शक्य नाहीच ', '  हे होणे नाही ' असे ठामपणे मनोजला सांगून मोकळा झालो होतो . पण मनोज माझ्या खूपच मागे लागला  व यावर " तू लिहलेच पाहिजे ! " असा त्याने हट्टच केला .  ' अर्थात आता हा मनोज कोण ? ' असे वाचकांच्या सहज मनात आले असेलच ! . सांगतो . मनोज हा माझा खूप जवळचा मित्र आहे . पण मनोजच्या ' दारू न पिण्याच्या ' मागे इतकी काही  थरारक स्टोरी असेल असे मलाही माहीत नव्हते .  'एकच प्याला ' हे राम गणेश गडकरी यांनी लिहलेले नाटक ज्यांनी वाचले असेल , त्यांना माहीतच असेल की 'दारू पिणे 'या विषयावर रा ग गडकरी यांनी लिहायचे असे काहीही बाकी ठेवलेले नाही . त्यानंतरच्या काळात चित्रपट , नाटके , पुस्तके इ मध्ये दारू वर जितके काही जोक आले असतील ते सारे...

(बहुतांश ) पुरुष गमावत असलेली सुवर्णसंधी - हेमंत सांबरे

Image
(बहुतांश ) पुरुष  गमावत असलेली  सुवर्णसंधी - हेमंत सांबरे आपल्या समाजात अजूनही काही कामे फक्त पुरुष करतील, तर काही फक्त बायका अशी विभागणी आहेच ! त्यामुळे काही सुवर्णसंधी कशा पुरुषांच्या हातातून निसटत आहेत , त्याबद्दल आज बोलूया .  विशेषतः असे आनंदाचे क्षण माझा मोठा मुलगा  अर्जुन लहान असताना मी ही गमावल्या होत्या . पण मुलगी झाल्यावर (२०२० साली ) मला त्याचा आनंद  घेता आला .  धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांना वेळ देता येणे , त्यांच्याशी मूल होऊन खेळणे , त्यांच्यासाठी जसे त्यांची आई करते  ते ते सर्व करणे (अर्थात बाप ,आईसारखे/आई इतके नाही करू शकत !) यासारखे सुख नाही .  माझी मुलगी आता तीन वर्षांची आहे . म्हणजे lockdown मध्ये तिचा जन्म झाला . त्यावेळी work from home असल्याने मला तिचे लहानपण पुरेपूर अनुभवता आले .  लहान मुलं जेव्हा झोपेतून उठतात किंवा आपण त्यांना बळेच झोपेतून उठवतो, तेव्हा कसली मज्जा येते ना ...यावेळी त्यांचे इतके मुड बदलत असतात की , काहीच सांगता येत नाही . अयोध्या (माझ्या मुलीचे नाव ) , तिला जर मनाच्या विरुध्द आपण उठवले तर ...

ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर - पुस्तक परिक्षण - हेमंत सांबरे

Image
आज दिनांक १५.०७.२०२३ रोजी विनया खडपेकर लिखित " ज्ञात - अज्ञात अहिल्याबाई होळकर " हे पुस्तक वाचून पूर्ण केले .  अलीकडे असे ठरवले आहे की , प्रत्येक पुस्तक वाचून झाले की त्यावर छोटेसे /जितके जमेल तितके परीक्षण लिहणार.  हे पुस्तक खूप सारा अभ्यास करून लीहले आहे यात कुठलीही शंका नाही . मुळात माझी स्वतःची उत्सुकता होती , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल जाणून घेण्याची .  विनया खडपेकर यांनी लिहलेले हे पुस्तकं म्हणजे कादंबरी नसून त्यावेळी नेमके काय घडत होते याचे जसेच्या तसे वर्णन आहे . हे करताना त्यांनी पुरावे म्हणून त्यावेळी होत असलेला पत्रव्यवहार , कागदपत्रे यांचा आधार घेऊन लिहलेले आहे . त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकांचे कुठलेही मनोरंजन होत नाही . पण ज्या वाचकांना इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता आहे , त्यांना मात्र हे पुस्तक खूप उपयोगी आहे .  अहिल्याबाई  यांचा जन्म १७२५ चां , तर मृत्यू १७९५ चां . त्यामुळे त्यांचे जीवन म्हणजे मराठेशाहीचा उत्कर्षाचा काळ ते मराठेशाहीचा उतरता काळ हे दोन्ही काळ आपल्याला बघायला मिळतात .  अहिल्याबाई होळकर यांच्या आ...

# Savarkar Samjun Ghetana - परीक्षण - डॉ लक्ष्मीकांत बाहेगावकर

Image
" *नव्या दमाच्या अभियंता लेखकाचा यशस्वी प्रयत्न"*   *सावरकर समजून घेताना*  ' *सोबतकार' ग.वा. बेहेरे सावरकरांबद्दल बोलताना म्हणतात स्वातंत्र्यवीर सावरकर हे रोजच्या रोज वनस्पतीला येणारे फुल नाही ते कधीतरी उमलणारे* *ब्रह्मकमळ आहे. अलीकडच्या काळात  सावरकरांवर टीका होत असताना स्वातंत्र्यवीरांच्या समर्थनार्थ नव्या* *दमाची अभ्यासू पिढी पुढे येऊन ताठ मानेने याला उत्तर द्यायला तयार झाली आहे.  हेमंत सांबरे या तरुण अभियंता लेखकाने* ' *सावरकर समजून घेताना' या पुस्तकाच्या माध्यमातून तात्याराव सावरकरांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्याचा यशस्वी प्रयत्न्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायनच असे आहे की शत्रुत्व भावनेतून स्पर्श केला तर हात भाजतो पण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते रसायन  मनात उतरते हे प्रास्ताविकेतील शुभा साठे यांचे विधान नव्याने सावरकर समजून* *घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.*   *स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी 28 मे रोजी हेमंत  सांबरे लिखित 'सावरकर समजून* *घेताना' हे पुस्तक प्रकाशित झाले. सावरकर अभ्यास...