अविरत सावरकर -हेमंत सांबरे

अविरत सावरकर ! ( Persistent Savarkar ) -हेमंत सांबरे हा माझा स्वतःचा ही अनुभव आहे , आपलाही असेल ! रोजच्या जीवनात आपण चालत राहतो ,काहीतरी करायचे ठरवतो , काम सुरूही करतो ,पण कितीतरी कामे आपण अर्धवट सोडूनही देतो .. आज नवीन वर्ष २०२२ सुरू होत आहे . आपण प्रत्येक जण यानिमित्ताने काही संकल्प करतो व हे संकल्प बहुधा महिनाभर ही टिकत नाहीत आणि हे सुरूच राहते ... सुरू करायचे---सोडून द्यायचे . पण काही लोक असे असतात की जे एखाद्या कामावर आपली पूर्ण श्रद्धा ठेवतात व ते काम पूर्ण झाल्याशिवाय सोडत नाही . सावरकर चरित्राचा आवाका प्रचंड मोठा आहे ...या चरित्रसागरात आपण जसजसे खोल-खोल जातो तसे अनेक मोती , रत्ने मिळत राहतात .सध्या बाळाराव सावरकर लिखित " स्वातंत्र्यवीर सावरकर- रत्नागिरी पर्व " हे पुस्तक वाचताना जागोजागी सावरकरांचा हा पैलू म्हणजे ' अविरत सावरकर - म्हणजेच Persistent Savarkar ' प्रकर्षाने जाणवला व हा गुण वा पैलू मला स्वतःला खूप भावतो म्हणूनच यावर विस्ताराने लिहावे असे वाटले . Persistent शब्दांचा अर्थ गुगल वर बघितला तर असा दिला आहे - "तुमची चूक आहे किंवा तुम...