#हिंदूंचे सण-उत्सव - भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ

# *हिंदूंचे सण-उत्सव - भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ हा विषय मांडण्याचे बरेच दिवस मनात होते , त्याला मुहुर्त आज मिळाला . हिंदू संस्कृती हा अतिशय खोल व गहन विषय आहे . यात आपण जितके आत आत जाऊ तितके आपल्याला अनेक व विविध प्रकारचे मोती ,रत्ने इ सापडत जातात . सहसा एखादा विषय आपल्या मनात बरेच दिवस असतो , पण आपण स्वतः Convince नसू तर तो कागदावर उतरत नाही ..अलीकडे माझ्या मुलाची मुंज ( उपनयन संस्कार ) झाली व या विषयाची व्याप्ती व समज आपोआपच आली व मी लेखणी परजून सज्ज झालो . आपल्या हिंदू धर्मात वर्षातील बाराही महिने सतत काही ना काही सण , उत्सव , लग्नं , समारंभ इ सुरूच असतात . तुम्ही जर बारकाईने बघितले वा अभ्यास केला तर प्रत्येक सण व आजूबाजूचा निसर्ग व त्यात होणारे बदल यांची अद्भुत सांगड घातलेली दिसून येईल . प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असतो व त्यामागे पैसा वा चलनवलन फिरण्याचे अर्थकारण दिसून येईल . या हिंदू धर्मातील कोणतीही गोष्ट *विनाकारण* अशी नसतेच मुळी , पण त्यामागचे अर्थशास्त्र समजून घेता आले पाहिजे .. कसे ते समजून ...