Esrael, Mosad and Rest World ! इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !- हेमंत सांबरे
*इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !* मोसाद हे नाव ऐकले नाही असा एकही वाचक मिळणे विरळा आहे . मोसाद म्हणजे इस्रायल नावाच्या छोट्या पण अत्यंत शक्तिशाली देशाची गुप्तहेर संस्था आहे . मोसादने स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे करून दाखवली आहेत . तसा अवघा इस्रायल देश व त्यांचे नागरीक " *राष्ट्र प्रथम* " या तत्त्वावर चालतात , म्हणूनच त्यांना एखाद्या उघड युद्धात हरवणे अशक्यप्राय आहे . अलीकडेच काही दिवसांपूर्वी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायल वर अमानुष हल्ला करत , अनेकांना क्रूरपणे ठार केले , अनेक महिला व लहान मुलांना ही त्यांनी सोडले नाही . या हल्ल्याच्या निमित्ताने इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष व त्याची चर्चा पुन्हा जगाच्या पटलावर सुरू झाली . अलीकडेच रुपाली भुसारी लिखित " दहशतवादाच्या विरोधात इस्रायल" हे अतिशय उत्तम पुस्तक माझ्या वाचनात आले . एकूण वीस प्रकरणे असलेल्या पुस्तकात लेखिकेने अत्यंत उत्तमपणे इस्रायल चे दहशतवाद विरोधी धोरण कसे आहे व मोसाद ची कार्यशैली याविषयी सांगितले आहे . त्याशिवाय पूर्वी मी ना ह पालकर लिखित " छळाकडून बळाकड...