Posts

#छावा चित्रपट मनोगत

Image
आत्ताच छावा बघून बाहेर आलो आहे ...मन प्रचंड अस्वस्थ व क्षोभित झाले आहे ..  प्रथम श्री लक्ष्मण उतेकर यांच्या धाडसाचे मनापासून कौतुक .. त्यांनी निर्भयपणे सत्य दाखवले आहे .  पराक्रमी संभाजी राजेंचा इतिहास खरोखर पिढ्यान् पिढ्यानं प्रेरणादायी आहे . आपल्या भारतात हिंदू धर्म का टिकून राहिला याचे सर्वात मोठे श्रेय जर द्यायचे असेल तर ते  संभाजी महाराज यांच्या बलिदानाला जाते .  दिग्दर्शक उतेकर यांनी मध्ये मध्ये काही वाक्य पेरून सर्वधर्मसमभावाचा तडका दिला असला तरी , हा चित्रपट अंतिमतः योग्य तो परिणाम साधून जातो व झोपलेल्या हिंदूनी ( आता तरी ) जागे व्हावे असा संदेश नक्कीच देतो .  औरंगजेबाच्या हातात जे जे कुणी काफिर सापडले त्या त्या सगळ्यांचा त्याने अशाच प्रकारे छळ केला आहे . त्यामुळे संभाजी महाराज त्याच्या तावडीत दुसऱ्या वेळी ( पहिल्यांदा आग्र्यात ) सापडल्यावर तो त्यांना सोडणार नव्हताच ,  पण ज्या धीरोदात्त वृत्तीने राजे मरणाला सामोरे गेले ते बघून त्याला मारणारा हा क्रूरकर्मा औरंगजेब स्वतःही नक्कीच धास्तावला असावा .  शेवटची संगमेश्वर येथे झालेली लढाई हा...

पुस्तक परिक्षण ा#11 रुल्स फॉर लाईफ#chetanbhagat

Image
#पुस्तक परीक्षण #11 रुल्स फॉर लाईफ #chetanbhagat अलीकडेच  पुण्यात झालेल्या पुस्तक महोत्सवामध्ये हे पुस्तक मी विकत घेतले. चेतन भगत हा माझा अतिशय आवडता लेखक आहे त्यांची बहुतांश पुस्तके मी वाचून पूर्ण केलेले आहेत. चेतन भगत यांनी लिहिलेले इंग्लिश खूप सोपे असल्यामुळे सहसा मी त्यांची इंग्लिश पुस्तके वाचतो, परंतु या महोत्सवात मला इंग्लिश पुस्तक न मिळाल्याने,  मी मराठी पुस्तक विकत घेतले व ते वाचून पूर्ण केले. या पुस्तकातून चेतन भगत यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित 11 नियम तयार केले आहेत आणि ते आपल्या वाचकांबरोबर त्यांनी शेअर केले आहेत. कथेच्या माध्यमातून आपल्या पुस्तकाची मांडणी करणे ही भगत यांची पद्धत आहे. त्याच पद्धतीने त्यांनी हेही पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे वाचताना अतिशय मनोरंजनात्मक वाटते आणि पुस्तक पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही . आरोग्य सारख्या महत्त्वाच्या विषयावर सुरुवात करून त्यांनी अगदी गुंतवणूक हा अलीकडच्या काळात दुर्लक्षित राहणारा घटक तोही त्यांनी या नियमांमध्ये मांडला आहे.  त्यांची मांडण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे पुस्तक बिलकुल ...

'कोई दिक्कत नही ' अर्थात आमची उत्तरप्रदेश यात्रा ! - हेमंत सांबरे

Image
कोई दिक्कत नही! ( अर्थात  आमची उत्तरप्रदेश यात्रा )  अर्थात आम्ही काही पूर्ण उत्तरप्रदेश फिरलो असे नाही . पण माझ्या व माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रवास होता .  मागच्या वर्षी आम्ही दक्षिणेत म्हणजे हंपी बदामी केले तर यावेळी उत्तर दिशा पकडुन आम्ही अयोध्या ( प्रभू श्रीराम जन्मभूमी  दर्शन ) , प्रयागराज , वाराणसी ची यात्रा पूर्ण केली .   आधीच्या एका पोस्टमध्ये मी आमच्या अयोध्या दर्शन बद्दल थोडेसे लिहले होते , पण आता यात्रा  पूर्ण झाल्यावर एकूणच उत्तर प्रदेश बद्दलचे आमचे अनुभव याबद्दल सविस्तर लिहावे असे वाटले म्हणून ही धडपड !  या प्रदेशांत दीर्घ काळ मुघलांनी राज्य केल्यामुळे इथे अजूनही अनेक मुसलमानी खुणा दिसतात . अनेक गावांची नावे अजूनही मुघली आहेत , ते बदलण्याचे काम ही योगी जी यांच्या नेतृत्वात सुरू आहे . याच राज्यात आग्रा शहर असून जेथे जगप्रसिद्ध ताजमहाल आहे , पण गेल्या वर्षभरातच ही ओळख (ताजमहालाची ) पुसली जाऊन याच राज्यात आता जगप्रसिद्ध असे भव्य दिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले आहे . नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवार...

माझी जन्मठेप - आत्मकथा - वीर सावरकर - पुस्तक परीक्षण

Image
आत्ताच माझी जन्मठेप वाचून हातावेगळे केले.  हे पुस्तक वाचण्याची नक्की कितवी वेळ आहे , हे मलाही आठवत नाही . इतक्या वेळा वाचूनही यावर लिहण्याची तीव्र ऊर्मी मात्र यावेळी खूप अशी दाटून आली आहे .  हे पुस्तक वाचून मला समजले आहे , ज्या ज्या भावना माझ्या मनाला व्यापून राहिल्या आहेत त्या त्या(शक्यतो) सगळ्याच गोष्टी तुम्हाला ही कळाव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा झाली आहे .. मी या आत्मकथेचे शेवटचे पान आत्ता उलटत आहे . अनेक वेळा सुटकेचे वृत्त येऊनही याआधी  प्रत्यक्ष सुटका कधीही न मिळालेले सावरकर यावेळी मात्र खरेच आपली सुटका होणारच ,हे कळून खूप भावनिक झालेले आहेत . वाचक म्हणून आपल्याही मनात अनेक संमिश्र भावना दाटून येतात . या जन्मठेपेचे  शेवटचे वृत्त वाचताना माझेही डोळे पाण्याने भरून आले आहे . पण हे कदाचित आनंदाश्रू आहेत , कारण या माझ्या कथेच्या नायकाची सगळ्या यातना मधून सुटका होत आहे म्हणून येणारे ते डोळ्यांतील अश्रू आहेत . दुसऱ्या बाजूने या दिव्य पुस्तकाची इतिश्री झाल्याने , आपण आता या पुस्तकापासून दुरावणार  याचेही दुःख असेल का ? म्हणूनच  अश्रू येत आहेत का ...

तुम्ही ' सावरकर ' हा चित्रपट बघितला का ? - हेमंत सांबरे

Image
*तुम्ही ' सावरकर ' चित्रपट बघितला का ?*  © हेमंत सांबरे #सावरकर  # स्वातंत्र्यवीर सावरकर #रणदीप हुड्डा  काल संध्याकाळी अखेर हा सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट बघितला .  " *सत्य हे नेहमी एकाकी प्रवास करत असते"* , असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे . सावरकरांचे जीवन म्हणजे या वाक्याचे यथार्थ दर्शन आपणास करून देते . पण इतका सारा एकाकी प्रवास करूनही , सत्याची कास न सोडता जगत राहणे हे अगदी एखाद्या सावरकरांनाच काय ते जमू शकते . मी खूप लहानपणी माझी जन्मठेप वाचले होते , त्यानंतर ही अनेक वेळा वाचले आहे , कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचे प्रेरणास्रोत आहे .  रणदीप हुड्डा अमराठी असूनही त्याने सावरकरांची भूमिका जगली आहे .  आपण चित्रपट बघत असताना समोर येणारी प्रत्येक फ्रेम , प्रत्येक प्रसंग खूप वेगाने आपल्या पुढून सरकत राहतात . तरीही प्रत्येक प्रसंग मनावर कोरला जातो , मग पुढे सरकतो . हे अगदी साहजिक आहे, कारण १८९७ ते १९५० इतका मोठा कालावधी तीन तासांत बसवणे ही कसरत आहे . तरीही हुड्डा ने अतिशय सयंत, ताकदीच्या अभिनयाने करून दाखवले आहे .  अनेक प्रसंग सांगण्यासा...

" वीर सावरकर "दशकांवरील धूळ झटकणारा चित्रपट

Image
अनेक दशकांवरील धूळ झटकणारा चित्रपट - ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' एखादा विषय अत्यंत क्लिष्ट आहे  , त्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश व त्यांचे वेगवेगळे घटक असतात तेव्हा तो विषय अगदी सहज हाताळला जात नाही. परिणामी त्यावर हळूहळू धूळ चढत जाते अन् तो विषय इतिहासजमा होतो की काय अशी शंका उपस्थित होते. पण वेळीच त्यावरील धूळ झटकली गेली तर तो विषय पुन्हा पुढे येतो. ' स्वातंत्र्यवीर सावरकर ' हा चित्रपट काहीसा असाच आहे. चित्रपट केवळ सावरकरांचा आहे हे म्हणणं काहीसं चुकीचं ठरेल कारण चापेकर बंधू , वासुदेव बळवंत फडके , लोकमान्य टिळक  , अनंत कान्हेरे याच चित्रपटातून संपूर्ण देशभरात बघितले जाणार आहेत. क्रांतिकारक हे भारतीय स्वातंत्र्याचे असे पान आहे जे थोडेसे गुंतागुंतीचे आहे पण त्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. ते पान अतिशय व्यवस्थित रित्या उलगडून दिग्दर्शकाने आपल्या समोर ठेवले आहे. त्यावरील दशकांची धूळ आता बाजूला झाली आहे. जर तुम्ही केवळ एका व्यक्तिरेखेला बघण्यासाठी जात असाल तर तुम्हाला आश्चर्याचा हा सुखद धक्का बसू शकेल इतकं नक्की. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव तर पू...

वैष्णव - लेखक - वि वा शिरवाडकर - कादंबरी - पुस्तक परीक्षण - हेमंत सांबरे

Image
#पुस्तक नाव - वैष्णव  #लेखक - वि वा शिरवाडकर #प्रकार - कादंबरी 'दुर्मिळ पुस्तके' नावाचे फेसबुकवर एक पेज आहे ..  त्यांच्याकडून ही " वैष्णव " नावाची कुसुमाग्रज लिखित ही छोटेखानी कादंबरी मागवली होती .  पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गांधींचे चित्र आहे .. आधी मला वाटले की खुद्द गांधींच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक असावे . पण वाचायला सुरुवात केली व विषय समजला . बरेच दिवस माझ्या पुस्तकांच्या कपाटात हे पुस्तक तसेच पडून होते , परवा सहज चाळायला सुरुवात केली तर ,त्यातल्या भाषेने मला इतकं खिळवून ठेवले की कादंबरी वाचूनच पूर्ण केली .  या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की , फक्त आणि फक्त मराठी भाषेचा वापर ! ही मराठी देखील अगदी अभिजात .  कथेचा कालावधी आहे १९३५ ते १९४२ . त्यावेळी घडत असलेल्या घटनांची पार्श्वभूमी घेऊन , त्याभोवती काल्पनिक पात्रांची गुंफण लेखकाने केली आहे . विनायकराव नावाचे प्राथमिक शिक्षक या कादंबरीचे नायक आहेत . सुरुवातीला त्यांचा स्वभाव अतिशय भित्रा व बुळा असतो . कोणीही काहीही बोलले तरी गुपचूप मान खाली घालून ऐकून घेणे , काहीही उत्तर न देता सहन करणे असा त्यांचा ...

सार्थ - डॉ एस एल भैरप्पा - पुस्तक परीक्षण

Image
पुस्तकाचे नाव - सार्थ  लेखक - डॉ एस एल भैरप्पा  परीक्षण लेखन - हेमंत सांबरे गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत .  #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होता . त्यानंतर त्यांचे हे  दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे .  हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली  द्विधा मनस्थिती ...

एक भाकर , तीन चुली - पुस्तक परीक्षण - लेखन - हेमंत सांबरे

Image
आजच देवा झिंजाड लिखित " एक भाकर , तीन चुली" हे पुस्तक वाचून पूर्ण केले .  सध्या थोडी तब्येत बरी नसल्याने , घरीच असल्याने वेळ मिळतोय तो हे पुस्तक तीनच दिवसांत झपाट्याने वाचून काढले .  केवळ महिनाभरात तीन आवृत्त्या प्रकाशित होत , हे पुस्तक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणार आहे , त्यामुळे वाचण्याची उत्सुकता होतीच .. आपल्यातील बहुतेकांचे बालपण , नंतरचे आयुष्य,  अतिशय सुरळीत , सुखात जर गेलेले असेल तर हे पुस्तक वाचून तुमची गात्र न गात्र थरारून उठतील , तुम्ही स्वतःच्या संकटाला कधीही संकट म्हणणार नाही ... इतके कष्ट , इतका अपमान , इतकी अवहेलना असे सारे काही वाट्याला येऊनही पारू (या पुस्तकाची नायिका ) फक्त पुढे पुढे चालतच राहते .. स्वतः अडाणी , निरक्षर असूनही आपल्या मुलाला शिकवायची जिद्द आपल्याला थक्क करून सोडते ..  रूढी ,परंपरा , अंधश्रद्धा , अज्ञान यामुळे कशा प्रकारे आयुष्याची फरफट होत राहते , याचे जिवंत चित्रण या कादंबरीत पाहायला मिळते . जगाच्या पाठीवर प्रत्येक धर्मात , जाती मध्ये रूढी , अंधश्रद्धा इ मुळे सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर तो स्त्रियांचा झाला ...

#हिंदूंची व्होट बँक व भविष्यातील नांदी !

Image
#हिंदूंची व्होट बँक व भविष्यातील नांदी!  हिंदूंची व्होट बँक तयार होत आहे . मध्येच काही वेळा काँगेस कडे जाणारे हिंदू परत तोच कटू अनुभव घेऊन परत येत आहेत . अर्थात भाजपाच आपले सर्व काही भले करील , अशा भ्रमात हिंदू नाहीत . पण काँगेस प्रमाणे आपले नुकसान करणार नाही ,हा विश्वास हिंदूंना नक्कीच वाटतो .  लवकरच प्रभू श्रीराम यांचे भव्यदिव्य मंदीर तयार होत आहे . हिंदूंचे हे गेल्या ५०० पेक्षा जास्त वर्षांचे स्वप्न होते , जे मोदी सरकारच्या काळात पूर्ण होत आहे . काश्मीर मध्ये ३७० कलम हटवून तेथे अतिशय महत्वाचे बदल होत आहेत . जरी अजूनही बरेच काम बाकी असेल , पण सुरुवात झाली आहे .  भारतीय जनतेने तब्बल ७० वर्षे काँगेस वर विश्वास दाखविला होता . त्या काळात हिंदू हितांची कामे झाली नाहीत , हे सत्य आहे . म्हणूनच भाजपला सलग २०१४ , २०१९ साली सत्तेत पूर्ण बहुमत मिळाले .  बहुमत असेल तर  बरीच कामे करता येतात हे प्रत्यक्ष अनेक कामे करून मोदी सरकारने सिद्ध करून दाखवले .  आता २०२४ चे पडघम वाजू लागले आहेत . अशावेळी तीन महत्वाच्या राज्यांत भाजपने विजय मिळवला आहे . २०२४ मध्ये होण...

२०१४ नंतर भारतात दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोट कमी कसे व का झाले ?

Image
येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाकिस्तान आणि बांगलादेश सीमा कुंपण घालून सुरक्षित केली जाईल. आत्तापर्यंत, सीमेचा 1100 किलोमीटर परिसर 'फ्लडलाइट्स'ने कव्हर करण्यात आला आहे. संपूर्ण सीमा उजळवून टाकण्यात येणार आहे. बीएसएफ च्या 542 नवीन सीमा चौक्या आणि सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 510 ऑब्झरवेशन पोस्ट चे टॉवर बांधण्यात आले आहेत.  पहिल्यांदाच हरामी नाला परिसरात निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत.  637 बीएसवफ चौक्यांवर वीज आणि सुमारे 500 ठिकाणी पाण्याची जोडणीही देण्यात आली आहे.  याशिवाय 472 ठिकाणी सोलर प्लांट बसवून सीमेवर रक्षण करणाऱ्या बीएसएफ जवानांची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे. बीएसएफने गेल्या 5 वर्षांत तब्बल 30000 किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ देशाच्या भावी पिढीला पोखरतात पण त्यातून निर्माण होणारा पैसा देशांतर्गत दहशतवादालाही आर्थिक रसद पुरवत असतो आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठीही वापरला जातो. सीमा सुरक्षा दलाने 2500 हून अधिक शस्त्रे हस्तगत केली आहेत, तर 90 हून अधिक परदेशी ड्रोन पाडले आहेत.  नवी दिल्लीत ड्रोन आणि सायबर फॉरेन्सिक लॅब...

बधाई हो ! - हिंदी चित्रपट समीक्षा - हेमंत सांबरे

Image
बधाई हो ! सहज सुंदर अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध झालेला आयुष्मान खुराणा माझा आवडता अभिनेता आहे . हटके चित्रपट करून ते हिट करणारा ही अभिनेता म्हणून तो प्रसिद्ध आहे . परवाच त्याचा " बधाई हो !" हा अप्रतिम सिनेमा दुसऱ्यांदा बघितला (आधी थेटर मध्ये बघितला होता आता OTT वर बघितला ) . यातला नकुल कौशिक (आयुष्मान ) बहुधा कुठल्यातरी IT कंपनी मध्ये नोकरी करत असतो . तिथेच त्याला त्याची प्रेयसी रीनी शर्मा भेटते . या चित्रपटाची कथा शंतनु श्रीवास्तव , ज्योती कपूर ,अक्षत घिडीयाल या तिघांनी मिळून लिहली असून  पटकथा संवाद - अक्षत घिडीयाल तर अमित शर्मा दिग्दर्शक आहे . एका सरळ रेषेत चालणाऱ्या कुटुंबाच्या घरात एक जगावेगळी घटना घडते व त्याने नकुलचे आयुष्य कसे u turn घेते यावर अतिशय अफलातून भाष्य करत ही कथा पुढे सरकत राहते . नकुलची आई (म्हणजे निना गुप्ता ) उतार वयात गरोदर राहते, त्यामुळे घडणाऱ्या गमती जमती सांगत , हलके फुलके विनोद करत , खुसखुशीत सवांदांची पेरणी करत हा चित्रपट आपले निखळ मनोरंजन करतो . ज्या आपल्या मुलाचे लग्न ठरवून आता त्यालाच मुल झाले पाहिजे (म्हणजे आपल्याला नातू झाला...

#गुरुजी नावाचा बाप - हेमंत सांबरे

Image
(एका निवांत क्षणी , उंब्री येथील आमच्या शेतात गुरूजीं सोबत )  #गुरुजी नावाचा बाप  - हेमंत सांबरे सध्याच्या काळात जिथे मुले आपल्या वडिलांना पप्पा , डॅडी इ म्हणतात पण आम्ही आमच्या बापाला गुरुजी म्हणून हाक मारत असायचो .. तेव्हा बरीच आजूबाजूची इतर माणसे , मोठे वयस्कर लोक ज्या नावाने हाक मारायचे तेच नाव बहुधा घरातही रूढ व्हायचे ... माझे वडील म्हणजे श्री सदाशिव बापूराव सांबरे हे प्राथमिक शिक्षक होते ...त्यामुळे अख्खा गाव त्यांना गुरुजी म्हणायचं मग आम्ही त्यांची मुलंही त्यांना ' गुरुजी ' असंच म्हणू लागलो ...विशेष म्हणजे आमच्या आईने ही त्यात आम्ही काही बदल करावा म्हणून काही प्रयत्न केले नाहीत (निदान मला तरी आठवत नाही ) . त्या काळात ह्या गुरुजी लोकांना तसा कमीच पगार असायचा (१९७० चां काळ) .. आमचे गुरुजींनी  (इथूनपुढे मी गुरुजी म्हणूनच उल्लेख करतो )तेव्हा संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे  नोकरी सुरू केली होती . गुरुजी स्वतः दहावीला असताना इंग्लिश विषयात ३ वेळा फेल झाले होते व पण  पुढे त्यांनी डी एड पूर्ण केलें.  आमचे मूळ गाव उंबरी बाळापूर हे झरेकाठी पासून ...

केदारनाथ -१७ जून - डॉ प्रकाश कोयाडे - पुस्तक परीक्षण -

Image
#केदारनाथ १७ जुन  #लेखक - डॉ प्रकाश कोयाडे #परीक्षण  मराठी साहित्य विश्वात ज्यांची पहिली कादंबरी प्रतिपश्चंद्र आली व त्या कादंबरीने खळबळ माजवून दिली . २०१९ साली आलेल्या या कादंबरीची सध्या २३ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून , OTT platform वर या पुस्तकावर आधारित एक web series ही येत आहे . त्यामुळे अर्थातच डॉ कोयाडे यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता होती .  त्यांची दुसरी कादंबरी केदारनाथ १७ जुन ही नुकतीच प्रकाशित झाली . मी हे पुस्तक माझे मित्र श्री नवनाथ जगताप यांच्या  # पुस्तकविश्व या दुकानातून घेऊन कालच वाचून पूर्ण केले .  '१७ जुन २०१३ या दिवशी केदारनाथ ( उत्तराखंड ) याठिकाणी मंदाकिनी नदीच्या खोऱ्यात जो भयंकर असा महापूर आला होता व त्यामुळे जे भूस्खलन झाले ', हा विषय केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी लेखकाने लिहिली आहे .  जसे इतर कांदबरी विषयांत गूढ , रहस्य इ विषय घेऊन लिहले जाते तसा इथे " सुटकेचा थरार " असा प्रकार लेखकाने हाताळला आहे .  सिद्धार्थ नावाचा डॉक्टर व त्याचे कुटुंबीय या प्रलय संकटात सापडतात त्यानंतर तो खूप सारी संकटे सहन करून...

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे.... हेमंत सांबरे

Image
( स्वर्गीय मुकेश )  कोई जब तुम्हारा हृदय तोड दे ...... - हेमंत सांबरे प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या आकंठ प्रेमात बुडालेला आहे ...पण तिला त्याची जाणीव नाही , तिला त्याची अजिबात ही किंमत नाही ...ती त्याच्या पासून दूर दूर जात आहे , त्याला ते दिसत आहे की ,त्याचे निर्व्याज प्रेम तिला कळत नाही ..त्याचे प्रेम मात्र स्वार्थाच्या , स्वमग्नतेच्या पलीकडे केव्हाच जाऊन पोहोचले आहे ..ती दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडत आहे , किंवा पडलीच आहे हे त्याला दिसत आहे ..ती आता परत येणार की नाही हे ही त्याला माहीत नाही ...तिच्या परत येण्याचे सगळेच रस्ते तिने बंद केले असेल तरी तो मात्र स्वतःचा दरवाजा केवळ तिच्यासाठी उघडुन बसला आहे ... ती जरी दुसऱ्या कुणाकडे गेली असली तरी याचे हृदय मात्र फक्त आणि फक्त तिच्यासाठी रिकामे आहे ... तो हे पक्के जाणतो की तिला आता आपली काहीही गरज नाही कारण ती खूप सुंदर आहे , तिच्यावर खूप जीव टाकणारे तिला मिळत आहेत ...पण तो तिला निक्षून सांगतो की हे सारे फक्त तिचे सौंदर्य , तिचे तारुण्य यालाच भुलून तिच्या जवळ आले आहेत ... पण , पण एक दिवस असा येईल की तिचे हे सौंदर्य , हे त...

मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे?- हेमंत सांबरे

Image
*मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे ?*  - हेमंत सांबरे मरहट्टा=मराठा  जो मरेगा लेकीन हटेगा नहीं!  *लढाई करताना एकवेळ हा मृत्यू पत्करेल , पण मागे हटणार मात्र नाही .*   अशी ज्याची ख्याती  सांगितली जाते तो म्हणजे *मराठा* ! पण शिवरायांच्या काळात व पुढे मराठ्यांनी जेव्हा ७५% भारत जिंकून जिकडे तिकडे आपली सत्ता स्थापन केली होती , तेव्हा उत्तरेकडे ' मराठा ' म्हणजे जो महाराष्ट्रातून उत्तरेत लढायला आला तो तो प्रत्येक सैनिक हा ' मराठा ' च समजला गेला . मग या सैनिकांत महाराष्ट्रातील सगळ्याच जातींचे सैनिक होते, त्यामुळे त्या अर्थाने लढाई करणारे सगळेच मराठा !  अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अतिशय ज्वलंत बनलेला विषय म्हणजे , ' *मराठा आरक्षण* ' .  माझे अनेक मित्र याच समाजातील आहेत . शिवाय हे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय शांतपणे व शिस्तबध्द असे सुरू आहे . त्यामुळे माझ्या सारख्या कुंपणाच्या बाहेर असलेल्या व्यक्तीला खूपच उत्सुकता होती . म्हणून , मी सर्व मित्रांशी बोलायला सुरुवात केली , या विषयाच्या खोलात जाऊन मी अभ्यास करू लागलो .  इतर (मराठा नसले...

Esrael, Mosad and Rest World ! इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !- हेमंत सांबरे

Image
*इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !*  मोसाद हे नाव ऐकले नाही असा एकही वाचक मिळणे विरळा आहे . मोसाद म्हणजे इस्रायल नावाच्या छोट्या पण अत्यंत शक्तिशाली देशाची गुप्तहेर संस्था आहे . मोसादने स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी  अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे करून दाखवली आहेत . तसा अवघा इस्रायल देश व त्यांचे नागरीक " *राष्ट्र प्रथम* " या तत्त्वावर चालतात , म्हणूनच त्यांना एखाद्या उघड युद्धात हरवणे अशक्यप्राय आहे .  अलीकडेच काही दिवसांपूर्वी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायल वर अमानुष हल्ला करत , अनेकांना क्रूरपणे ठार केले , अनेक महिला व लहान मुलांना ही त्यांनी सोडले नाही . या हल्ल्याच्या निमित्ताने इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष व त्याची चर्चा पुन्हा जगाच्या पटलावर सुरू झाली .  अलीकडेच रुपाली भुसारी लिखित " दहशतवादाच्या विरोधात इस्रायल" हे अतिशय उत्तम पुस्तक माझ्या वाचनात आले . एकूण वीस प्रकरणे असलेल्या पुस्तकात लेखिकेने अत्यंत उत्तमपणे इस्रायल चे दहशतवाद विरोधी धोरण कसे आहे व मोसाद ची कार्यशैली याविषयी सांगितले आहे .  त्याशिवाय पूर्वी मी ना ह पालकर लिखित " छळाकडून बळाकड...